Friday, January 20, 2006

मी तुला म्हटलंच होतं...

Another Poem from Manogat.com, I Love this Poem..by Tushar Joshi, nagpur.
- An2

"मी तुला म्हटलंच होतं
तुला राहवणार नाही
एक दिवस अनावर होऊन
तूच सांगशील सगळं काही

मी तुला म्हटलंच होतं
सोपं नाही दूर राहणं
आपल्यात थोडं शिल्लक आहे
सुख दुःख देणं घेणं

मी तुला म्हटलंच होतं
तू नाही म्हटलं तरी
तुझं माझं नातं होणार
दाट खोल केव्हा तरी" ...by - Tushar Joshi, Nagpur..

-- :: Another Poem By Tushar Joshi ::

खात्री आहे तू पुन्हा भेटशील
नेहमी प्रमाणे गोड हसशील
काय झालंय? सवाल करशील
मी तुझ्यापासून तुलाच मागणार आहे
मी तुला सगळं सांगणार आहे

अश्चर्याने मागे सरशील
कदाचित तू नाही म्हणशील
किंवा कदाचित माझ्याकडून
असली अपेक्षाच नव्हती म्हणशील
तुझा कसलाही निर्णय
मला केवळ छळणार आहे
तरीही मी न लपवता
मनात चाललेली ढवळाढवळ
तुला दाखवणार आहे
मी तुला ढवळणार आहे
मी तुला सगळं सांगणार आहे

तुझ्याशी भेट
योगायोग कसा म्हणू?
का गुंतलो?
जन्माजन्माचं नातं आहे जणू?
मला पार वेडावलं आहे
या प्रश्नाने
हे वादळ पेलणार नाही मी एकट्याने
माझ्याबरोबर तुलाही यात ओढणार आहे
मी तुला सगळं सगळं सांगणार आहे..

0 Comments:

Post a Comment

<< Home