मराठी विश्व.
काही दिवसापुर्वी एक आंग्ल पंडित आपल्या देशामध्ये 'इग्रंजी भाषेची भारतातील स्थिती' या विषयावर अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये आले होते.त्यांनी एक खुपच मार्मिक शेरा दिला होता. त्यांच्या मते इंग्रजीचे प्रस्थ पुर्ण जगामध्ये तर वाढत आहे हि वस्तुस्थिती आहेच, पण इतर देशामध्ये आणि भारतीय लोकांमध्ये एक यासंबधी गुणात्मक भेद आहे. भारतीय लोक इग्रंजी भाषा त्याच्या बारकाव्यासह तर शिकतातच, पण कोठेतरी आपल्या मुळ भाषा जपण्याचा यथायोग्य प्रयत्नही करतात. ही जाणीव युरोपातील, अमेरीकेतीला भल्या भल्या लोकांनाही नसते. हे वाचुन माझ्या मनाचे मळभ काही अंशी दुर झाल्यासारखे वाटले.
आजही आपल्या आजुबाजुला, मराठी भाषेच्या संबधी काहीनाकाही सदोदित चालु असते. संमेलने, पुस्तकांची प्रदर्शने, चर्चा, परीसंवाद, शाळा-महाविद्यालयातील काहीनाकाही उपक्रम इत्यादी इत्यादी.
मायमराठीचे अगत्य असु द्यावे, हि प्रार्थना.
0 Comments:
Post a Comment
<< Home