नेताजींना रशियात फ़ाशी दिले?
नेताजींचा मृत्यु हे अजुनही न उकललेले गूढ आहे. असंख्य हिंदुस्थानियांचा असा दृढ विश्वास होता आणि आहे की नेताजी त्या तथाकथित विमान अपघातात मृत्यु पावलेच नाहीत! त्या नंतर अनेक अफ़वा प्रसृत झाल्या होत्या.
आता पर्यंत शाहनवाज खान व खोसला या दोन आयोगांना देखिल कोणताही १००% सिद्ध असा कुठलाच ठाम निष्कर्ष सप्रमाण मांडता आला नव्हता. आता मुकर्जी आयोग अजूनही ठाम निष्कर्षाप्रत आलेले नाही, त्यांना अनेक अडचणी येत आहेत.
आजच्या म.टा. मध्ये एक खळबळजनक सिध्दांत मांडला गेला असल्याचे प्रतिपादन केले गेले आहे. नेताजी रशियात गेले व स्टॅलिनने त्यांना जपान या राष्ट्राच्या सहकारी सेनेचा प्रमुख म्हणून नेताजींना फ़ाशी दिले असा नवा सिध्दांत आहे. मात्र या बाबत कमालीची गुप्तता का? हे व असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
सविस्तर वृत्तांत
0 Comments:
Post a Comment
<< Home