बोका !
करून झाला विचार पक्का
मनात माझ्या तुझाच छक्का
छछोर मांजर खट्याळ बोका
कुठे न श्रीखंड फस्त चक्का
उद्या दुपारी तुझी सुपारी
खुशाल मारू हवेत फक्का
सफेद पाद्री सफेद सेना
उजाड काशी उजाड मक्का
तुझी लढाई तुझी चढाई
तुला न बुक्की मलाच धक्का
सभेत श्रोते तुझे नव्याण्णव
मला बिचारा उगाच टक्का
- माफी
(Manogat.com)
0 Comments:
Post a Comment
<< Home