Thursday, February 02, 2006

तुझे नि माझे...

तुझे नि माझे
जुळले होते
एकच गाणे
तुझ्या नि माझ्या
मनात होते
स्वप्न दिवाणे...

तुझा नि माझा
एकच होता
प्रवास जेव्हा
तुझ्या नि माझ्या
एकच वाटे
मनास तेव्हा...

तुझे नि माझे
एकसारखे
अजून आहे
तुझ्या नि माझ्या
डोळ्यांची कड
भिजून आहे...
(manogat.com)

0 Comments:

Post a Comment

<< Home