Saturday, February 04, 2006

आउटसोर्सिंग कि शोषण ?

१९९० नंतर भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'मनमोहन सिंग' यांनी 'आर्थिक उदारमतवादा'चे धोरण स्विकारले. याचा सर्वाधिक फ़ायदा त्यावेळी नविन असलेल्या 'संगणक' क्षेत्राला झाला. भारतिय 'संगणक तज्ञ' परदेशात जाउ लागला आणि तिथे नाव/पैसा/प्रसिद्धि कमावु लागला. हा काळ तसा 'सुवर्नकाळच' म्हणावा लागेल कारण कि नंतरचे 'डॉट-कॉम ' स्थित्यंतर ज्या वेगाने वाढले त्याच वेगाने खाली आले. बरेच भारतिय 'संगणक तज्ञ' हातात 'पिंक-स्लिप' घेवुन घरचा रस्ता धरु लागले.

आत्ताचे नविन स्थित्यंतर म्हणजे ' आउटसोर्सिंग ' -परदेशातील कामे भारतात बसुन करणे.

अर्थातच या गोष्टिला अमेरिका सहित इंग्लंड , जर्मनी या पुढारलेल्या देशांत जनक्षोभाला समोरे जावे लागत आहे कारण कि तेथिल महागडया मनुष्यबळाला हातातील कामे 'भारतिय संगणक तज्ञ्याच्या' हातात सोपवावी लागत आहेत आणि बेरोजगार व्हावे लागत आहे. तसे पहिले तर याला त्यांनी 'जागतिक प्रवाह' म्हणुनच पाहिले पाहिजे. याच देशांनी नाहि का आपला माल इतर देशांत विकूण रग्गड नफ़ा मिळवला?

पण याचा सर्वाधिक त्रास होतो आहे तो भारतिय 'संगणक तज्ञ्याला' . हे ' आउटसोर्सिंग ' चालुच नये यासाठी हे परदेशिय मुद्दामच प्रोजेक्ट चे वेळापत्रक अमानवी (In-Human) बनवत आहे. बंगलोर मधिल एखाद्या संगणक तज्ञ्याला त्याची घरि जायची वेळ विचारा फ़क्त! .

अशीच जर स्थिति कायम रहिली तर भारतिय कुटूंबव्यवस्थाच मोड्कळीस येइल.

मध्यांतरि जर्मनी मध्ये भारतिय 'संगणक तज्ञ्यांना' तर चक्क मारहाण करण्यात आली.

हे गुलामगिरीचे दुसरे रुप नाहि तर काय आहे (आर्थिक गुलामगिरी म्हणुयात फ़ार तर) ? हे शोषण थांबवले जाणारच नाहि काय?
(mnogat)

0 Comments:

Post a Comment

<< Home