Thursday, February 09, 2006

हातोहात.....

त्याचं असं होतं की
आपले हात अनेक प्रकरणात गुंतलेले असतात
त्यापैकी काही प्रकरणे हातावेगळी करावीत
तर उरलेली हाताबाहेर जातात
किंवा हातघाईवर येतात !
आणि आपण हताश होऊन
कुणाला तरी आपला हात दाखवतो
मग तो त्याच्या हाताच्या बोटावर
आकडेमोड करून हसून म्हणतो
'हात्तिच्या! हस्त नक्षत्रापर्यंत थांब
अन नंतर बघ नशीब कसं हात देत ते.
सगळी कामे अगदी हातोहात होतील!'
आणि आपण हातावर हात ठेवून बसून राहतो
तो पर्यंत आपल्याला हवे असलेले हात
निघून जातात
दुसऱ्या कुणाचा तरी हात धरून!
मग आपल्या हातात काहीच उरत नाही.
हात चोळत बसण्याशिवाय...! असो.
तुम्ही भेटलात म्हणून सांगून टाकलं हातासरशी.
हातचं काही राखून न ठेवता!.

(जयन्ता५२)manogat.

0 Comments:

Post a Comment

<< Home