Sunday, February 12, 2006

हासली तू की....

हासली तू की मनाला
चांदण्याचा स्पर्श झाला
की फुलांना उमलताना
गंधवेडा हर्ष झाला

हासली तू मंद वारे
वाहताना स्तब्ध झाले
आसमंती चंद्र तारे
लाजले भयमुग्ध झाले

हासली तू आणि माझ्या
पाहण्याचे गीत झाले
शब्द भारावून गेले
भाव सारे प्रीत झाले

तुषार जोशी, नागपूर
(manogat)

1 Comments:

At 12:33 PM, Blogger Tushar Joshi said...

Thanks for posting my poem here. I also blog at tusharvjoshi.blogspot.com you can visit and be in touch.

Tushar Joshi, Nagpur

 

Post a Comment

<< Home