Friday, February 17, 2006

संत व्हॅलेन्टाईनची आरती....

हे गॉड, हे गॉड व्हॅलेन्टाईन
आला, आला,आला तो सुदिन ॥ ध्रु ॥

घेती तुझे नाम आज १४-फे
पाठविती एकमेका किती लिफाफे
लिफाफ्यात त्या पत्रिका 'बदामी'
'तूच माझी' अशी प्रत्येकीस हमी!

हे गॉड, हे गॉड व्हॅलेन्टाईन......

आजच्या दिनी खरेदी प्रचंड
आई-बापांना नसता भूर्दंड
विसरले सारे या देशीचे संत
तू परदेशी पण तूच पसंत


हे गॉड, हे गॉड व्हॅलेन्टाईन
आला, आला,आला तो सुदिन ॥ ध्रु ॥

जयंता५२ ( manogat )

0 Comments:

Post a Comment

<< Home